भैरवगड संवर्धन मोहीम 1 – (1 मे 2019)

सर्वसाधारण भटका ज्या गडावर सहजासहजी चढू शकत नाही अशा गडावर संवर्धन मोहीम राबविणे म्हणजे महाकठीण कार्य पण ऐकतील ते सफर सह्याद्री कसले…! 15 जणांच्या टीमने हा विडा उचलला आणि दोराच्या साहाय्याने साहित्य वरती पोचविण्यात आले आणि मोरोशी भैरवगड माथ्यावरील पाण्याचे टाके पहिल्याच मोहिमेत अर्ध्याहून अधिक साफ करण्यात आले.भैरवगड सारख्या दुर्गम ठिकाणी पिण्याचे पाण्याचे साधन म्हणजे पाण्याचे एकमेव टाके आहे ते सुद्धा सुरुवातीला आहे.गडावर गेल्यावर वरती पाण्याचे साधन नाही जी टाके आहेत ती सर्व मातीने बुजून गेलेली आहेत हे भटकंतीच्या निमित्ताने सफरच्या टीमच्या लक्षात आले म्हणूनच 1मे 2019 हा महाराष्ट्र दिन आणि दुर्गदिन सुद्धा याचे विशेष औचित्य साधत सफर सह्याद्रीतर्फे हि मोहीम आखण्यात आली.गडावर जाणाऱ्या पायऱ्यांवरील माती सुद्धा या मोहिमेत साफ करण्यात आली तसेच गडाच्या वाटेवर माजलेले निवडुंग तोडून वाट मोकळी करण्यात आली.

सफरच्या 15 सदस्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला होता.या मोहिमेसाठी सदस्य निकेतन आडिवरेकर यांनी आर्थिक मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार या मोहिमेत स्थानिक गावकरी सुद्धा महत्वपूर्ण योगदान लाभले त्याबद्दल त्यांचे आभार मोहिमेसाठी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचे पुनश्च धन्यवाद..लवकरच दुसरी मोहीम घेऊन राहिलेले काम पूर्ण करून गडाचे गडपण जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न सफरची टीम करेल.नाव महत्वाचे नाही कार्य होणे महत्वाचे आहे आपणही सर्वजण यात सहभागी होऊ शकता…

मोहिमेतील सहभागी सदस्य..

1)किरण भालेकर
2)तुषार शिनगारे
3)अमर गोरुले
४) सदा रेडकर
5)श्रीकांत वाडकर
6) अभिजीत गुंजाळ
7)अक्षय तांबे
8) अभिषेक परुळेकर
9) अंकुश केळवेकर
10)शिवा सपरे
11)प्रसाद शिंदे
12)तुषार नरवडे
13)शैलेश गुरव
14)रोनल
15)शंकर

सफर सह्याद्री ट्रेकर्स-भटक्यांचे अनोखे जग

www.safarsahyadri.com
https://www.facebook.com/safarsahyadri/
https://www.facebook.com/safarsahyadri.trekkers
https://www.instagram.com/safarsahyadri/
http://allevents.by/Safarsahyadri

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *