राजमाची संवर्धन मोहीम 1

राजमाची श्रीवर्धन वरील चिलखती बुरुजातील चोरदरवाज्याने घेतला मोकळा श्वास

सफर सह्याद्री ट्रेकर्सने आयोजित केलेल्या चोरदिंडी संवर्धन मोहिमेमध्ये चोरदिंडीला मातीच्या ढिगाऱ्यातुन बाहेर काढण्यात यश लाभले.दि.12 जानेवारी रोजी हि मोहीम घेण्यात आली. यामध्ये सफरच्या 10 मावळ्यांनी जिद्दीने व अथक परिश्रमाने केलेल्या प्रयत्नातुन चोरदिंडी मातीमधून आणि झाडाझुडुपांच्या विळख्यातून बाहेर पडून सर्वांच्या निदर्शनास येऊ लागली.या मोहिमेसाठी सहकार्य केलेले दानशूर हात, सफरचे सर्व राबलेले हात, मार्गदर्शक,हितचिंतक सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद व आभार…

अद्यापही या चोरदिंडीचे आणि इतर कामे बाकी आहेत यासाठी सातत्यपूर्ण योगदानातून या ऐतिहासिक अवशेषांना नवसंजीवनी देण्याचा सफरचा मानस आहे.यासाठी गरज आहे ती गडकोटांच्या संवर्धनासाठी तत्पर असणाऱ्या मावळ्यांची आणि आर्थिक सहकार्यातून या मोहिमेला बळ देणाऱ्या दानशूर हातांची …स्वराज्याचा या मोहिमेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मदत करून या संवर्धन मोहिमेला बळकटी देण्यासाठी पुढे या असे आम्ही सफरच्या वतीने आवाहन करतो..

पुढील मोहीम -26 जानेवारी 2020

सफर सह्याद्री ट्रेकर्स-भटक्यांचे अनोखे जग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *