राजमाची उधेवाडी मदतकार्य

एक हात मदतीचा …

सफर सह्याद्री ट्रेकर्स व सर्व मित्रपरीवार माध्यमातून राजमाची उधेवाडी येथे निसर्ग चक्रीवादळात प्रचंड हानी झालेल्या कुटूंबाना मदतीचा हात देण्यात आला.यामध्ये जमा झालेल्या मदतीतून 8 कुटूंबाना आर्थिक स्वरूपात प्रत्येकी 3000/ मदत थेट कुटूंबप्रमुखाच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली.

तसेच Maha Adventure council (MAC) या संस्थेला राजमाची उधेवाडीसाठी लागणारे घरावरील पत्रे व घरबांधणी साहित्य यासाठी 10,000/ मदत करण्यात आली.

या कार्यात मदत केलेले सफरचे सर्व सदस्य मित्रमंडळी,हितचिंतक, मार्गदर्शक तसेच सर्व ज्ञात-अज्ञात मित्र या सर्वांचे मनःपूर्वक आभार…

सफर सह्याद्री ट्रेकर्स,मुंबई

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *