काळालाही आव्हान देणारा दुर्गम दुर्ग,जीवाचा थरकाप उडवणारी चित्तथरारक चढाई,सरळसोट कातळकडा,अंगावर येणारा ओव्हरहँग आणि निमुळत्या पायऱ्या महाराष्ट्रातील हाडाच्या भटक्यांना याची दिवसाउजेडी स्वप्ने नाही पडली तर नवलच…!
सफर सह्याद्री ट्रेकर्सने 1 मे 2019 रोजी भैरवगडावरील माथ्याजवळ असणारे टाके सफाईच्या दृष्टीने पहिली संवर्धन मोहीम घेतली यात यश येऊन गुडघाभर अधिक दगडमातीने भरलेले अर्धे टाके साफ करण्यात आले उर्वरित टाके सफाईसाठी अजून एक प्रयत्नाची व आर्थिक सहकार्याची गरज होती.सफरच्या सर्व मित्रमंडळींने न सांगताच मदतीचा ओघ सुरू केला आणि काम अधिकच सोपे झाले.16 जणांची एक उत्कृष्ट टीम तयार झाली 2 जूनला ठरलेल्या नियोजनात उर्वरित टाके साफ करण्यात आले.तसेच गडवाटेवरील निवडुंग तोडून वाटा मोकळ्या करण्यात आल्या.