“इतिहास ध्यानी घेत नाही तोवर तो केवळ एक भूमीखंड असतो.मात्र इतिहासाचा दिप मनी उजळता क्षणी ती पवित्र युद्धभूमी होते.इथल्या मातीच्या प्रत्येक ढेकळाला त्या शूर पूर्वजांनी धरतीवर सांडलेल्या रक्ताचा गंध आहे.तो आपल्याला जाणवायला हवा मगच ही दुर्ग यात्रा सुफळ संपूर्ण होते एरवी नुसती पायपिट होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून किल्ले राजमाची श्रीवर्धन बालेकिल्ला चिलखती बुरूजाचे चोरदिंडी दरवाजा संवर्धन मोहिम क्रमांक २ यशस्वी पार पडली आणि दरवाजांना मोकळा श्वास मिळाला यासाठी राबलेल्या सर्व हातांचे खूप खूप धन्यवाद ❣️ 🙏